नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे ९८२ प्रकरणातून २ कोटी ८७ लाख ४२ हजार ८४४ तर दाखलपुर्व ५३८ प्रकरणातून १ कोटी ५० लाख ८१ हजार ४०८ रूपये वसुल करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीसाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी सर्व न्यायलयातील तडजोडसम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणामध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बांधकाम यांचे थकीत बीले तडजोडीने निकाली निघण्यासाठी आज जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रलंबित प्रकरणात दिवाणी प्रकरणे ३७, मोटार अपघात प्रकरणे ३२, चलनक्षम धनादेश प्रकरणे ६५, कौटूंबिक वाद प्रकरणे ११, फौजदारी प्रकरणे ५३, भूसंपादन प्रकरणे ३ इतर किरकोळ फौजदारी प्रकरणे ७८२ असे एकूण ९८२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात २ कोटी ८७ लाख ४२ हजार ८४४ रूपये वसुल करण्यात आले. तर दाखलपुर्व प्रकरणांमध्ये बँक वसुली ७०, वीज थकबाकी वसुली २, पाणीपट्टी व थकबाकी वसुली ४६०, टेलिफोन व श्रीराम ट्रान्सपोर्ट प्रकरणे ६ असे एकूण दाखलपुर्व ५३८ प्रकरणे सामाजस्याने निकाली काढण्यात आले. यात १ कोटी ५० लाख ८१ हजार ४०८ रूपये वसुल करण्यात आले.
आज झालेल्या राष्ट्रीय न्यायालयात जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस. तिवारी व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे यांच्या उपस्थितीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक एस.एस.भागवत, दिवाणी न्यायाधीश वरिष्टस्तर, मुख्य एस.टी.मलिये, मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही.जी. चव्हाण यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी मदतीसाठी ऍड. एम.एम.पठाण, डी.जी. पाटील, एस.व्ही.पाटील, श्रीमती दिपाली रघुवंशी, मनोज परदेशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती वाय.के. राऊत, दुसरीसह दिवाणी न्या.कनिष्ठस्तर एन.बी.पाटील, लोकअदालतीचाप्रसंगी नवीन नियुक्त न्यायीक अधिकारी एस.एस.बडगुजर, ए.आर. कुलकर्णी, एस.बी. मोरे, पी.एम. काजळे, श्रीमती आरती कृष्णा बनकर, एम.बी.पाटील, एस.आर.पाटील आदी उपस्थित होते. सदर लोक न्यायालतीचा यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालय प्रबंधक आर.जी.वाणी, नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष ऍड. के.एच. साबळे, न्यायालयीन कर्मचारी व विधीतज्ञ यांनी सहकार्य केले.