Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२० प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

team by team
August 2, 2021
in क्राईम
0
राष्ट्रीय लोकअदालतीत १ हजार ५२०  प्रकरणे निकाली,४ कोटी ३८ लाखाची नुकसान भरपाई

नंदुरबार |  प्रतिनिधी

जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे ९८२ प्रकरणातून २ कोटी ८७ लाख ४२ हजार ८४४ तर दाखलपुर्व ५३८ प्रकरणातून १ कोटी ५० लाख ८१ हजार ४०८ रूपये वसुल करण्यात आले.
राष्ट्रीय लोकअदालतीसाठी नंदुरबार जिल्ह्यासाठी सर्व न्यायलयातील तडजोडसम प्रलंबित फौजदारी, दिवाणी, मोटार अपघात दावे प्रकरणे व दाखलपुर्व प्रकरणामध्ये वीज, पाणीपट्टी, घरपट्टी व बांधकाम यांचे थकीत बीले तडजोडीने निकाली निघण्यासाठी आज जिल्ह्यात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रलंबित प्रकरणात दिवाणी प्रकरणे ३७, मोटार अपघात प्रकरणे ३२, चलनक्षम धनादेश प्रकरणे ६५, कौटूंबिक वाद प्रकरणे ११, फौजदारी प्रकरणे ५३, भूसंपादन प्रकरणे ३ इतर किरकोळ फौजदारी प्रकरणे ७८२ असे एकूण ९८२ प्रकरणे निकाली काढण्यात आले. यात २ कोटी ८७ लाख ४२ हजार ८४४ रूपये वसुल करण्यात आले. तर दाखलपुर्व प्रकरणांमध्ये बँक वसुली ७०, वीज थकबाकी वसुली २, पाणीपट्टी व थकबाकी वसुली ४६०, टेलिफोन व श्रीराम ट्रान्सपोर्ट प्रकरणे ६ असे एकूण दाखलपुर्व ५३८ प्रकरणे सामाजस्याने निकाली काढण्यात आले. यात १ कोटी ५० लाख ८१ हजार ४०८ रूपये वसुल करण्यात आले.
आज झालेल्या राष्ट्रीय न्यायालयात जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश आर.एस. तिवारी व जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव डी.व्ही.हरणे यांच्या उपस्थितीत तदर्थ जिल्हा न्यायाधीश एक एस.एस.भागवत, दिवाणी न्यायाधीश वरिष्टस्तर, मुख्य  एस.टी.मलिये, मुख्य न्याय दंडाधिकारी व्ही.जी. चव्हाण यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. त्यांनी मदतीसाठी ऍड. एम.एम.पठाण, डी.जी. पाटील, एस.व्ही.पाटील, श्रीमती दिपाली रघुवंशी, मनोज परदेशी यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. तसेच दिवाणी न्यायाधीश क स्तर श्रीमती वाय.के. राऊत, दुसरीसह दिवाणी न्या.कनिष्ठस्तर एन.बी.पाटील, लोकअदालतीचाप्रसंगी नवीन नियुक्त न्यायीक अधिकारी एस.एस.बडगुजर, ए.आर. कुलकर्णी, एस.बी. मोरे, पी.एम. काजळे, श्रीमती आरती कृष्णा बनकर, एम.बी.पाटील, एस.आर.पाटील आदी उपस्थित होते. सदर लोक न्यायालतीचा यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालय प्रबंधक आर.जी.वाणी, नंदुरबार वकील संघाचे अध्यक्ष ऍड. के.एच. साबळे, न्यायालयीन कर्मचारी व विधीतज्ञ यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पूरग्रस्तांसाठी नाशिक शहर भाजपा युवा मोर्चा व युवा ऊर्जा फाऊंडेशन तर्फे मदत

Next Post

कोरोना शहीद आरोग्य कर्मचार्‍यास 50 लाखाचा विमा मंजूर

Next Post

कोरोना शहीद आरोग्य कर्मचार्‍यास 50 लाखाचा विमा मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add