Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आता रोपवेच्या सहाय्याने घेता येणार अस्तंबा ऋषींचे दर्शन, 15 कोटीची तरतूद : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांची माहिती

team by team
April 12, 2022
in राजकीय
0
आता रोपवेच्या सहाय्याने घेता येणार अस्तंबा ऋषींचे दर्शन, 15 कोटीची तरतूद : पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांची माहिती

नंदुरबार l प्रतिनिधी
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी धडगाव तालुक्यातील अस्तंबा येथे रोपवेची निर्मिती करण्यासाठी 15 कोटीची तरतूद केली असल्याचे माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी म्हणाले की, आदिवासी बांधवांना यापुढे खावटी अनुदानाऐवजी स्वत:च्या पायावर उभे करुन सक्षम करण्यासाठी व रोजगार निर्माण करता यावे यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. ११ लाख ५५ हजार लाभार्थ्यांना खावटी अनुदान वाटपाचे उद्दिष्ट होते. १० लाख ५० हजाराहून अधिक आदिवासी बांधवांना याचा लाभ देण्यात आला आहे. असे असले तरी यापुढे आता आदिवासी बांधवांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी व रोजगार निर्माण करण्यासाठी कुक्कटपालन, शेळीपालन, मत्स्य व्यवसाय यासारख्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजना देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती होवून स्थलांतर रोखण्यास देखील मदत होणार आहे. दरम्यान, सिकलसेलबाबत बोलतांना त्यांनी सिकलसेलला रोखण्यासाठी लग्न पद्धतीत बदल करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान सिकलसेलसाठी धडगाव तालुक्यातील असली येथे केंद्र निर्मिती करणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच नंदुरबार जिल्हा आकांक्षित जिल्हा असल्याने ११० कोटींचा वाढीव निधी मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले. ६० ते ७० लाख मनुष्य दिवस रोजगार निर्मिती व्हावी यासाठी देखील प्रयत्नशील असल्याचे ॲड.पाडवी म्हणाले.धडगाव तालुक्यातील उंच शिखर असलेल्या अस्तंबा येथे रोपवेची निर्मिती करण्यासाठी 15 कोटीची तरतूद केली असल्याचे माहिती आदिवासी विकासमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिली.त्यामुळे भविष्यात नागरिकांना रोपवे द्वारे अस्तंबा येथे दर्शन करता येणार आहे. पर्यटस्थळांना चालना मिळाल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल त्यामुळे काही प्रमाणात स्थलांतर थांबण्यास मदत होईल असेही. ॲड.पाडवी म्हणाले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी,२०२२-२३ शैक्षणिक वर्ष १३ जून पासून होणार सुरू

Next Post

रब्बी हंगामातील धान,भरडधान्य खरेदी नोंदणी मुदत 30 एप्रिल पर्यंत

Next Post
रब्बी हंगामातील धान,भरडधान्य खरेदी नोंदणी मुदत 30 एप्रिल पर्यंत

रब्बी हंगामातील धान,भरडधान्य खरेदी नोंदणी मुदत 30 एप्रिल पर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add