म्हसावद l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 195 वी जयंती संन्मित्र क्रीडा मंडळ व अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे साजरी करण्यात आली. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून विनम्रपणे अभिवादन केले. याप्रसंगी ज्ञानी कुलकर्णी म्हणाले की, समाजातील अनेक वाईट गोष्टी दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी अविरत संघर्ष केला. समाजातील विषमता नष्ट करून तळागाळातील घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ त्यांनीच केली. आद्य समाजसुधारक म्हणून त्यांची देशात ओळख आहे. या वेळेस प्रतिमा माळी, के. के. सोनार, शिवपाल जांगिड, रोहन माळी, आदींनी पुष्पगुच्छ अर्पण करू महात्मा फुले यांना अभिवादन केले.