नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय किसान सेना व भीलीस्थान लायन सेनेतर्फे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले जयंती व आदिवासी क्रांतिवीर खाज्या नाईक पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमेस भारतीय किसान सेनेचे प्रदेश महासचिव पंडित तडवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी, भटके-विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अंकित वळवी,तालुकाध्यक्ष बिंदास गावित, तालुका उपाध्यक्ष रिवदास वळवी, शहराध्यक्ष राजेश माळी, गुड्डू राठोड, गुड्डू वसावे, पिंट्या भील,दीपक भिल,सुधाकर भील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.