नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दारु बनविण्याचे विषारी स्पीरीट वाहतुकीवर कारवाई करीत ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीट व ६ लाख रुपये किमतीची महींद्रा बोलेरो चार चाकी वाहन जप्त केले असुन दोघांविरूध्द गुन्हा दाखल करून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ३० जुलै रोजी रोजी धुळे येथुन नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद गावाकडे चारचाकी वाहनातुन दारु बनविण्यासाठी उपयोगी येणारे स्पीरीटची वाहतुक होणार असल्याची खात्रीशीर बातमी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दि.३० जुलै रोजी शहादा शहरातील लोणखेडा येथील लाईफ केअर हॉस्पीटजजवळ सापळा लावला . सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास म्हसावद गावाच्या दिशेला एक महिंद्र बोलेरो वाहन भरधाव वेगाने येतांना दिसल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला संशय आला म्हणून पथकातील कर्मचार्यांनी हात देवुन वाहन उभे करण्याचा इशारा दिला असता वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने त्यांचा पाठलाग करुन शिताफीने वाहन ताब्यात घेतले . पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात बनावट दारु बनविण्याकामी उपयोगी पडणारे ५ लाख ५० हजार रुपये किमंतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीटने भरलेल्या ११ प्लास्टीकच्या टाक्या आढळुन आल्या , त्यांना परवाना आहे काय असे विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितल्याने , ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे एकुण २२०० लिटर स्पिरीट व ६ लाख रुपये किमतीची महींद्रा बोलेरो चार चाकी वाहन (क्रमांक एम.एच.४३,डी.२५६०) असा एकुण ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन दोन्ही संशयीत आरोपी चालक व क्लिनर शाहरुख नजिर मण्यार रा . म्हसावद ता . शहादा जि . नंदुरबार, बाळु महादु डामरे रा . अभय कॉलेज रोड , धुळे यांच्या विरुध्द शहादा पोलीस ठाण्याला गुन्हा दाखल करण्यात आला . असुन शाहरुख नजिर मण्यार याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित , अपर देवराम गवळी , स्थानिक गुन्हे अन्वे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोहेकॉ दिपक गोरे , पोलीस नाईका विकास कापुरे , पुरुषोत्तम सोनार , पोलीस अमलदार विजय ढिवरे , शोएब शेख , रामेश्वर चव्हाण यांचे पथकाने केली. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे .