नंदुरबार l प्रतिनिधी
प्रभू श्रीरामचंद्र यांच्या जन्मोत्सव म्हणजे श्रीरामनवमी या दिवशी नंदुरबार शहरातून सवाद्य भव्य शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा श्रीराम मंदिर, नेहरू पुतळ्याजवळुन रविवार दि. १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता निघणार आहे
या शोभायात्रेमध्ये रथावर म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉलीवर प्रभू श्रीरामचंद्र यांची प्रतिमा तसेच श्रीराम श्रीलक्ष्मण आणि शबरीमाता यांच्या जिवंत देखावा त्याचप्रमाणे कळसधारी महिलांसह विविध मंडळ, संघटना, संप्रदाय श्रीरामभक्त या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. समारोपाचा शेवटी सामूहिक श्री रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा पठण, महाआरती व त्यानंतर आलेल्या मान्यवरांच्या मार्गदर्शन होऊन प्रसाद वाटपाने शोभायात्रेचा समारोप होईल.शोभा यात्रेचा मार्ग श्रीराम मंदिर नेहरू पुतळ्याजवळ सुरुवात होऊन गांधी पुतळा मार्गे हाट दरवाजा, अहिल्याबाई होळकर विहीर,श्रीगणपती मंदिर, सोनार खुंट, सराफा बाजार, जळका बाजार, छ. शिवाजी महाराज चौक, चैतन्य चौक, शक्ती सागर मंडळ ते श्रीमोठा मारुती मंदिर बाहेरील बाजूस शोभायात्रेचा समारोप होईल. तरी श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समितीने केले आहे.








