Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

team by team
April 6, 2022
in आरोग्य
0
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने 14 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

म्हसावद l प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून या महामानवांना मानवंदना देण्याकरिता त्यांनीच दाखविलेल्या जनसेवेच्या व्रताला पुढे नेण्याचा निर्धार राष्ट्रहित, शिक्षणहित, विद्यार्थीहित आणि शिक्षकहित जपणारी एकमेव शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नंदुरबार शाखेने केला आहे.
आपण नंदुरबारसारख्या भौगोलिक वैविध्य असलेल्या जिल्ह्यात सेवा देत आहोत. नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून डोंगराळ क्षेत्रात राहणाऱ्या बऱ्याच आदिवासी बालकांमध्ये सिकलसेल नावाचा गंभीर आजार आढळून येतो. रक्ताशी संबधित असलेल्या ह्या आजारात रक्ताचा पुरेसा पुरवठा न होऊ शकल्याने कित्येक बालकांना आपला जीव गमवावा लागतो. किंबहुना नंदुरबार जिल्ह्यात रक्ताची कमतरता ही नेहमीच भासत असते. साने गुरुजींपासून समाजसेवेचा वसा लाभलेल्या आपल्या सर्व गुरुजनांना आपल्या कर्मभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी रक्तदानासारखी दुसरी संधी नाही. सिकलसेल रोगाशी झुंजत असलेल्या पीडितांना आपल्या रक्ताचा काही अंश देऊन ह्या लढाईत खारीचा वाटा उचलण्याची संधी आपण गमावता कामा नये. म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा नंदुरबार यांच्यातर्फे 14 एप्रिल 2022 (गुरुवार) रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे.या पुण्यकर्माच्या मोहिमेत आपला सहभाग नक्की नोंदवा. असे आवाहन करण्यात आले आहे.
खालील google link वर आपण आपल्या सहभागासाठी नोंदणी करू शकता.
https://forms.gle/L3nob3XRRde7WcWu5

स्थळ – महात्मा फुले स्मारक – शहादा*
दि. – 14 एप्रिल 2022*
वार – गुरुवार
वेळ – सकाळी 8.00 ते 12.00*l

संपर्क
1) सिद्धार्थ बैसाणे – 9881766190*
2) किशोर ठाकरे – 8888747004*

यासोबतच आपण आपल्या प्रत्येक केंद्रसंघटकांशी संपर्क साधून कार्यक्रमाच्या दिवशी थेट नियोजित स्थळावर येवून रक्तदान करू शकता.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी हा सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचा पक्ष : डॉ.अभिजित मोरे

Next Post

रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

Next Post
रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

रेल्वे अपघातात जखमी असतानाही लोकांच्या मदतीला धावला भालेर येथील तरुण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add