तळोदा l प्रतिनिधी
शहादा,तळोदा तालुक्यातील विजेच्या गंभीर प्रश्न मार्गी लावण्यासाठी वीज वितरण कंपनीने नवीन आठ ३३ के. व्हीं. केंद्रांना प्रशासकीय मान्यता दिली असून आता तातडीने निधी उपलब्ध करून या केंद्रांची कामे हाती घ्यावी,अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहादा,तळोदा या दोन तालुक्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे.शिवाय या दोन्ही तालुक्यातील शेतकरी ऊस, केळी,पपई,कापूस अशा नगदी पिकांवर अधिक भर देत असतात.त्यातही उसाचे क्षेत्र मोठे असते.साहजिकच कृषी पंपांची संख्या देखील प्रचंड आहे.तथापि दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना विजेची समयास कायम स्वरुपी तोंड द्यावे लागत आहे.कारण कृषी पंपाच्या संख्येचा तुलनेत ३३ के. व्हीं.उपकेंद्राचे संख्या पुरेशा प्रमाणात वाढलेली नाही.त्यामुळे एका केंद्रा क्षमते पेक्षा अधिक कृषी पंपाच्या भार आहे.परिणामी अधिक विजेच्या लोड मुळे रोहित्रंवर तांत्रिक बिघाडाची समस्या कायम उद्धभवत असते.या पुरेशा रोहित्रा अभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे जीकरीचे झाले आहे.सातत्याने विजेच्या लपंडावामुळे पिके पाण्या अभावी करपत असतात साहजिकच शेतकरी अक्षरशः हवालदील झाला आहे.या दोन्ही तालुक्यातील विजेची समस्या मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांनी शहादा,तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या व्यथा व्यक्त केली होती.त्यांनी महावितरण च्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बैठका लावल्या होत्या.त्यानुसार या उपकेंद्राच्या उभारणीसाठी त्यांनी गेल्या वर्षी मार्च मध्येच तातडीने प्रस्ताव तयार करून मोठा धनपुर, रेवानगर ता.तळोदा, चांडसैली,रामपूर, गणोर, बामखेडा, कलंबू,सावलदा अशी सात उप केंद्रे मंजूर केलेली आहेत.विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रस्तांवर तातडीने कार्यवाही केली आहे.आता त्यासाठी प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून कामे हाती घेण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.तसे वीज वितरण कंपनीच्या थकीत वीज बिल वसुलीत दिलेल्या उद्दिष्ट्यत या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीस चांगले सहकार्य केले आहे.म्हणजे शासनाच्या निकशा नुसार वीज बिल वसुली तून आलेल्या रक्कमेतून ३३ टक्के रक्कम त्या तालुक्यातील वीज समस्या सोडवली जाऊ शकते.आमदार राजेश पाडवी यांनी वीज समस्या सोडविण्यासाठी 33 के. व्हीं. उप केंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.