नंदुरबार l प्रतिनिधी
हिरालालकाका चौधरी यांचे परमस्नेही व तेली समाजाचे जेष्ठ नेते तसेच जिल्हाध्यक्ष कै.खंडूआप्पा जयराम चौधरी यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. हिरा उद्योग समुह परिवाराचे जेष्ठ सदस्य ,मार्गदर्शक तसेच तेली समाजाचे प्रणेते होते.त्यांच्या या निधनाबद्दल हिरा उद्योग समुहाच्या परिवारात व संपूर्ण तेली समाजामध्ये हळहळ निर्माण होऊन मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यामुळे आ.शिरीष हिरालाल चौधरी यांचा दि. ४ मार्च रोजी वाढदिवसानिमित्ताने होणारे कार्यक्रम व सदिच्छा भेटीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे असे आवाहन हिरा उद्योग समुह परिवार व मा.आ.शिरीषदादा चौधरी मित्र परीवार,नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.