तळोदा | प्रतिनिधी
तळोदा गुरव समाजातर्फे कोरोना काळ व संभाव्य कोरोनाची तिसरी लाट विचारात घेऊन कोरोना व योगा या विषयावर व्याख्यान पुणे येथील नामांकित योग व फिजिओ थेरापिस्ट डॉ.अशोक ठाकरे यांच्या सौजन्याने दि.२७ जुलै रोजी तळोदा येथील गुरव समाज पंचवाडी येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एम.के.माळी हे होते.
यावेळी पुणे येथील फिजिओ थेरापिस्ट डॉ.अशोक ठाकरे यांनी कोरोना आपत्तीशी सामना करतांना प्राणायम, ध्यान धारणा, हास्य योग, आहार याच बरोबर फिजिओ थेरपी कशी उपयुक्त ठरू शकते हे अनेक उदाहरणातून पटवून दिले. योग साधनेतून रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, आहार, हास्य योग पुढील काळात कोरोनासह इतर आजाराबद्दल काय व कसे निरोगी रहाता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख पाहुणे एम.के.माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक रतिलाल गुरव, निंबा गुरव, बन्सीलाल गुरव, सतिष राजकुवर, बाबुलाल गुरव, देविदास गुरव, दिलीप गुरव, प्रकाश माळी, दिलीप माळी तसेच राहुल गुरव, ज्ञानेश्वर गुरव, जितेंद्र गुरव, शिरीष गुरव आदींसह समस्त श्री गुरव समाज बांधव व महिला भगिंनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतिष राजकुवर यांनी केले. तर आभार प्रदर्शन बंन्सीलाल गुरव यांनी मानले.