Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात

team by team
April 3, 2022
in राजकीय
0
गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात

शिरपूर l प्रतिनिधी
उसनवार दिलेल्या पैशांची व्याजासकट परतफेड केल्यानंतरही शेती बळकावण्यासाठी दबाव आणून खोटी कागदपत्रे व गावगुंडांची भीती दाखवणारे प्रसन्न जयराज जैन व त्यांचा भाऊ हर्षल जयराज जैन यांच्यावर सावकारीसह गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी ओंकार नथ्थू सोनार व त्यांचे संपूर्ण कुटूंब 29 मार्चपासून शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते तरी ४ दिवस उपोषणाला झाले असतानाही पोलिस प्रशासनाने अद्याप आंदोलनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे
याबाबत नारायण सोनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या शहादा येथे राहत आहेत. त्यांच्या मालकीची शिरपूर खुर्द शिवारात गट नं.117/4 मध्ये एक हेक्टर 27 आर शेती आहे. त्यांच्या शेताशेजारीच प्रसन्न जैन व हर्षल जैन यांची शेती आहे. तोंडओळख असल्यामुळे बियाणे, खते आदिंसाठी ओंकार सोनार यांनी जैन यांच्याकडून काही रक्कम उसनवारीने घेतली होती. त्याची व्याजासकट परतफेडही करुन झाली. मात्र मोक्याची जमीन असल्यामुळे ती बळकावण्याचा प्रयत्न जैन बंधू करीत आहेत. त्यांचा आमच्या मिळकतीशी काहीही संबंध नसतांना सौदापावती असल्याचे सांगून दिशाभूल करीत शेती बळकावण्याचे कारस्थान करीत आहेत. त्या शेतात सोनार यांनी सुबाभूळची व्यापारी तत्वावर लागवड केली असून सध्या सुबाभूळ कापणीवर आहे. मात्र शेतात गेल्यावर गावगुंड बोलावून जैन बंधू मनाई करीत असतात. स्वत:ची शेती आम्हाला कसण्यास विरोध करतात. शेतातील सुबाभूळ परस्पर कापण्याचा दोघांचा डाव आहे. सुबाभूळ काढण्यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली. मात्र स्वत:च्या पदाचा आणि राजकीय संबंधांचा दुरुपयोग करुन त्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करु दिला नाही. हक्काच्या शेतीत पेरणी, मशागत, पीक कापणी आदि कामे करता येत नसल्यामुळे आमच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्याला प्रसन्न जैन व हर्षल जैन हे बंधू जबाबदार आहेत. अवैध सावकारीसह त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आमची मागणी असून त्यांना पाठिशी घालणार्‍या शिरपूर पोलिसांच्या निषेधार्थ उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांच्या कार्यालयाबाहेर उपोषणास बसल्याचे सोनार यांनी सांगितले. त्यांच्यासोबत नारायण सोनार, पुरुषोत्तम सोनार, छोटू सोनार, राजेंद्र सोनार, सौरभ सोनार, छायाबाई सोनार, वंदनाबाई सोनार, रेखाबाई सोनार, जागृती सोनार, सुनील सोनार हेदेखील उपोषणात सहभागी झाले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

स्वयंसेवकांच्या त्याग आणि बलिदानातून संघाचा विस्तार : प्रा. गौरीशंकर धुमाळ

Next Post

रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अल्पसंख्यांक विकास व हक फाऊंडेशनतर्फे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add