नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाअंतर्गत अपंग कल्याण योजनेतून ५ टक्के सेस निधीतून नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील कोपर्ली येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा पाठपुराव्यामुळे दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीनचे वाटप करण्यात आले.
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या प्रयत्नातुन कोपर्ली तसेच परिसरातील दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधी ५ टक्के अंतर्गत अपंगांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी व ते स्वयंपूर्ण व्हावेत या हेतूने मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या आदेशानुसार गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ॲड.राम रघुवंशी तसेच नवीन बिर्ला,अर्जून अहिरे, शहीद,रशीद खाटीक, रविंद्र चौधरी,अशोक तांबोळी,रविंद्र मराठे, बापू मराठे,सिताराम अहिरे,जिवन पवार,डॉ. गोपाल चौधरी,छोटू चौधरी,सागर इन्दानी, जितेन्द्र राणा,रविंद्र तांबोळी,अल्ताफ, मुसताक पठान,उखा भिल यांच्यासह कोपर्लीतील शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना झेरॉक्स मशीनचे वाटप करण्यात आले.








