नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी उल्का पडल्यासारख्या तेज शलाकाचं दृश्य पाहायला मिळालं त्यामुळे ते नेमकं उल्का पिंड आहे की सॅटॅलाइटचे तुकडे होऊन तो विखुरला आहे . यासंदर्भात खगोलप्रेमींसह नागरिकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे . यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ते आकाशात दिसलेली घटना इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे असल्याचे स्पष्ट केले.
न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर – पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद चे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.








