म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर एक तरुणाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.याबत ओळख पटविण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी केले आहे.
याबत पोलिस सूत्रानी दिलेल्या महितीनुसात शहादा तालुक्यातील इस्लामपुर ते अंबापुर रस्त्यावर हबीन जंगा तेली यांच्या गट नंबर 262 /2/अ या शिवारात ऊसाच्या शेतात दि.1 एप्रिल सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान एक अनोळखी तरुणाचे वय अंदाजे 38 वर्ष आहे.याची खबर इस्लामपुर चे सरपंच जालम पवार यानी याबत माहिती दिल्यावर म्हसावद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट देऊंन पाहणी केली.त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन म्हसावद ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी पाठविन्यात आला.घटनास्थळी काहीही आढळले नाही.सरपंच जालम पवार यानी दिलेल्या खबरी नुसार म्हसावद पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबात पुढील तपास पोलिस निरीक्षक निवृत्ति पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजेंद्र चव्हाण हे करीत आहे.म्हसावद पोलिसांनी ओळख पटविन्याचे आवाहन केले आहे.काही माहिती असल्यास 9421530251या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








