नवापुर l प्रतिनिधी
तालुक्यातील बंधारफळी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बंधारफळी गावातील गेल्या आठ दिवसांपासून वीज कनेक्शन कट केल्यामुळे गावात वीज पुरवठा बंद आहे. गावातील वीज पुरवठा बंद असल्याने गावकऱ्यांना मागील आठ दिवसांपासून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

बंधारफळी गावात पाणी नसल्यामुळे महिलाना गावाबाहेर लांब वर जाऊन स्वयंपाक व इतर गोष्टींसाठी पाणी आणावे लागत आहे. यामुळे महिला वर्गाचे मोठे हाल होत आहेत या सोबतच एवढ्या कडकत्या उन्हाळ्यात होणारा उष्णतेचा त्रासात वीजपुरवठा खंडित केल्यामुळे लहान पासून पर्यंत नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बंधारफळी गावात वीजपुरवठा नसल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण गावात अंधाराचे सावट पसरलेला असतं विजेचा पुरवठा होत नसल्याने गावातील सर्व व्यवसाय आठ दिवसांपासून ठप्प आहेत.याबाबतीत वीज कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गावाला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रांसफार्मर नादुरुस्त झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच वीज पुरवठा सुरू होईल अशी माहिती देण्यात आले आहे. गावातील वीजपुरवठा खंडित असून आठ दिवसांपासून पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थ नितेश गावित यांनी माहिती दिली.








