नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या प्रलंबीत सेवा विषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे काळी फीत लावून धरणे आंदोलन करण्यात आले असुन ४ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेने राज्यातील नायब तहसिलदार , तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांच्या शासनस्तरावर प्रलंबीत सेवा विषयक बाबी तात्काळ निकाली काढण्यात याव्यात या अनुषंगाने वारंवार निवेदने देवून तसेच बैठकामधुन पाठपुरवा करण्यात आला . परंतु अद्यापही खालील नमूद सेवा विषयक बाबी शासनस्तरावर प्रलंबीत आहेत . नायब तहसिलदार संवर्गाची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . तहसिलदार संवर्गाची सन २०११ पासूनची सेवा जेष्ठता यादी प्रसिध्द करणे . नायब तहसिलदार संवर्गातून तहसलिदार संवर्गात पदोन्नती करणे . तहसिलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती करणे .नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांची कालबध्द पदोन्नती बाबतचे प्रलंबीत प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे . परिविक्षाधीन नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे परिविक्षाधीन कालावधी समाप्ती बाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे . नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांचे स्थायित्व प्रमाणपत्राबाबतचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे . नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गातील अधिकार्यांचे प्रलंबीत सेवा जोड प्रस्ताव तात्काळ निकाली काढणे . सेवा निवृत्त नायब तहसिलदार व तहसिलदार यांचे प्रलंबीत सेवानिवृत्ती प्रकरणे व संबंधीत लाभ तात्काळ निकाली काढणे . महिला अधिकार्यांचे बाबतीत महसूल विभाग वाटप करतांना प्राधान्यांने सोईचे ठिकाण देण्याबाबत सुधारणा करणे .वरील प्रमाणे नमूद बाबी ह्या शासन स्तरावर प्रलंबीत असुन असे निदर्शनास आले आहे की, नायब तहसिलदार व तहसिलदार संवर्गाच्या नियमीतीकरण व सेवाजेष्ठता यादी प्रसिध्द करणेबाबतच्या प्रस्तावास कोकण , नाशिक व पूणे विभागास मंजुरी मिळाली आहे . परंतु औरंगाबाद , अमरावती व नागपूर विभागांचे प्रस्ताव अद्याप शासनास सादर झालेले नाही . त्यामुळे नायब तहसिलदार ते तहसिलदार व तहसिलदार ते उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे . यामुळे महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे . याबाबत महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्या पदाधिकार्यांची व सदस्यांची बैठक पार पडली असून प्रलंबीत बाबींचे निषेधार्थ खालील प्रमाणे आंदोलन करण्याचा निर्णय नाईलाजास्तव संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकारी यांनी घेतला आहे असे निवेदनात म्हटले आहे. याबाबत सर्व जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात येवुन आज दि .१ एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालया समोर काळ्या फिती लावून धरणे आंदोलन करण्यात आले.१८ एप्रिल रोजी रोजी सर्व सदस्य, पदाधिकारी रजा टाकून विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असुन याबाबत मागण्या मान्य न झाल्यास ४ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा ईशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे काळी फीत लावून धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, नंदुरबार तहसीलदार भाऊसाहेब थोरात,
नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी, तळोदा तहसीलदार गिरीश वखारे, अक्कलकुवा तहसीलदार सचिन मस्के,अक्राणी तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, नंदुरबार नायब तहसीलदार भीमराव बोरसे, राजेश अमृतकर, रमेश वळवी, रिनेश गावित, नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय रामजी राठोड, नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय श्री.चौधरी, तळोदा नायब तहसीलदार शैलेश गवते , नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय शेखर मोरे, नायब तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय श्रीमती सोनवणे आदी उपस्थीत होते.