नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसतर्फे दि.१ एप्रिल २०२२ रोजी शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंपा संमोर राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या पदधिकारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या विकासाच्या जन्म दिवस म्हणजे १ एप्रिल फुल दिवस म्हणजे महागाई, बेरोजगारी,खोटे जुमले या आश्वासनाच्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष अमृत लोहार,न.पा विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,राष्ट्रवादी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इंद्रीस टिनवाला,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शरद पाटील,शहर उपाध्यक्ष राकेश गावीत,गोलु पाटील,सनी सावरे,अर्जुन सावरे,मयुर सावरे,हेमंत नगराळे,अजय जाधव ,शारूख खाटीक ,सलमान बागवान,अली खाटीक,समीर शेख सह राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पदधिकारी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष अमृत लोहार म्हणाले की १ एप्रिल म्हणजे एप्रिल फुल मागील २०२४ वर्षा पासुन केंद्र सरकार ने या जनतेला एप्रिल फुल बनविले आहे.या निमित्ताने राष्ट्रवादी कॉग्रेस व युवक राष्ट्रवादी कॉग्रेस ने संपुर्ण महाराष्ट्र भर आज १ एप्रिल एप्रिल फुलचा कार्यक्रम म्हणून डिजेल,पेट्रोल,दाळीजे भाव वाढले आहे याचा निषेध आम्ही व्यक्त करण्यासाठी नवापूर राष्ट्रवादी युवक कॉग्रेस तर्फे करण्यात येत आहे.आज पेट्रोल,डिझेल,गॅस,चे भाव गगणाला भिटले आहे.यात कोरोना महामारी मध्ये सामान्य जनता हवलदिन झाली आहे.लोकांना रोजगार नाही लोकांचा रोजगार बडाला आहे.अशा परीस्थीती मध्ये ही केंद्रसरकारने जी भाववाढ केली आहे ती सामान्य जनतेला न परवडणारी आहे म्हणून नवापूर युवक राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने १ एप्रिल २०२२ हा एप्रिल फुल बनवुन मोदी सरकार व केंद्र सरकारचा महागाई वाढविले यांचा संदर्भात आम्ही आंदोलन करत आहे.