नंदुरबार l प्रतिनिधी
औरंगजेबाने शंभूराजांची हत्या पकडल्या गेलेल्या क्षणापासून दररोज एक एक अवयव तोडत ४० दिवस वेदना देऊन अत्यंत क्रूरपने केली. तो संपूर्ण महिना कूठल्याही एका सूखाचा त्याग महाराजांसाठी करायचा असतो फाल्गुन महिना सूतकाचा पाळायचा असतो म्हणजेच धर्मवीर बलिदान मास होय असे म्हणत पूर्ण फाल्गुन महिन्यात शंभुराजांना नित्य आदरांजली आणि धर्मवीर बलिदान मास नित्यपणे पाळून फाल्गुन अमावस्येला श्रद्धांजली कार्यक्रमाने बलिदान मासाची सांगता करण्यात आली.
हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक यांनी पूर्ण फाल्गुन मासात दररोज सकाळी ७:३० वाजता शिवस्मारक,जुनी नगरपालिका येथे एकत्रित येऊन बलिदान मासा पाळला. आज फाल्गुन अमावस्येला श्रद्धांजली अर्पण करून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता करण्यात आली. यावेळी छ. संभाजीराजे यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट प्रतिज्ञा आणि श्लोकाने करण्यात आली. उपस्थित हिंदुत्वनिष्ठ यांना बलिदान मासाचे महत्त्व हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी जितेंद्र मराठे, जयेश भोई, राजू चौधरी, जितेंद्र राजपूत, मयुर चौधरी, पंकज डाबी,बालधारकरी विनायक राजपूत, पृथ्वीसिंह राजपूत, जागृती पाटील आदी उपस्थित होते.