नवापूर l प्रतिनिधी
नवापूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडक पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी 33 लाख 74 हजाराचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे कडे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केलेल्या पाठ पुराव्या मुळे 1 कोटी चा निधीला मंजुरी मिळाली आहे.
नवापूर शहरात नगर परिषद अस्तित्वात आल्या पासून अनेक विकास कामे झाली परंतू शहरातील महापुरुषाचे पुतळा सुशोभीकरणाचे काम रखडले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या पाठ पुराव्य मुळे शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणासाठी पालक मंत्री यांचे अध्यक्ष असलेल्या समिती कडून मंजूर मिळाली असून तसे पत्र जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी नगर परिषदे ला दिले आहे सदर पुतळा सुशोभीकरणासाठी भीम सैनिकांची अनेक वर्षा पासूनची मागणी पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त करणयात येत आहे.