नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील बर्डीपाडा येथील एका १७ वर्षीय मुलीला अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पालकांच्या कायदेशीर रखवालीतून कुठेतरी पळवून नेले. याबाबत मुलीच्या वडीलांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.राजेश येलवे करीत आहेत.