खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय नवापाडा येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला त्यात पिरामल स्वास्थ्यचे व नीती आयोगाच्यावतीने जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले.कोविड जनजागृतीसह क्षयरोगाची माहिती देण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्यातील माध्यमिक विद्यालय नवापाडा (गव्हाळी )येथे पिरामल स्वास्थ्य व नीती आयोगाच्या वतीने कोविड जनजागृती व जागतिक क्षयरोग दिवस निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विद्यालय नवापाडा (गव्हाळी ) चे मुख्यध्यापक सुभाष कदम , शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पिरामल स्वास्थ्यचे कर्मचारी जांब्या एस. वसावे-समुदाय संघटक(अक्कलकुवा तालुका ), रेक्सोना एम. वसावे, देवा वळवी हे उपस्थित होते. यावेळी प्रभाकर आर. सागर यांनी क्षयरोगाचे फायदे, तोटे व 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध डाँ. राबर्ट कोक यांनी लावला व प्रत्येक क्षयरुग्णपर्यंत पोहचूयात मिळून सगळे एकत्र निदान, उपचार आणि काळजी हेच सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सूत्र अशी माहिती दिली.तसेच रॅली काढून घोषणा दिल्या. कोविड जनजागृती व क्षयरोगाची विषयी सविस्तर माहिती देण्यात आली.








