खापर l प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू केलेल्या नेहरू युवा केंद्र व संस्कृती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय आस-पडोस संसद २०२२ कार्यशाळा समाजकार्य महाविद्यालय तळोदा येथे आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उषा वसावे होत्या तर उद्घाटक म्हणून नेहरू युवा केंद्र नंदुरबार जिल्हा समन्वयक होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ महाविद्यालय तळोदा प्रा.जयपालसिंह शिंदे , संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळ अध्यक्ष मिलिंद धोडरे ,सचिव सुजाता साळवी होत्या. याप्रसंगी स्वागतगीत रिता गुलाले,बाळकृष्ण निकुंभे यांनी सादर केले.
नेहरू युवा केंद्र आस-पडोस यावर श्री.कौशिक,जयपालसिंग शिंदे यांनी व्याख्यान दिले.त्यात ते म्हणाले,भारत देश युवकांनाचा देश आहे,सद्यस्थितीत भारत जगात महासत्तेच्या दिशेने वळत आहे.पण राजकारण युवकांचा सहभाग फार कमी प्रमाणात होत आहे.नेहरू युवा केंद्र आस-पडोस युवा संसद युवकांना नेतृत्व घडवून आणण्यासाठी साहाय्य करत आहे.तरी युवकांनी यात सहभाग घेऊन स्वतःच्या नेतृत्व कौशल्याचा विकास करून घ्यावा.सदर कार्यक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डोंगरे यांनी केली.आभार प्रदर्शन प्रा.डॉ.रामचंद्र परदेशी यांनी केले.








