नंदूरबार l प्रतिनिधी
बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्रातंर्गत क्षेत्राबाहेरील ) व डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना मंजूर निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती गणेश रुपसिंग पराडके यांनी कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कृषीमंत्री दादाजी भुसे यांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२०.२०२१ पासुन बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्रातंर्गत क्षेत्राबाहेरील) व डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या योजना महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज स्विकृती , लाभार्थी निवड पासून लाभार्थ्यांना अनुदान अदा करण्यापर्यंत प्रक्रिया ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहे . सदर योजनांची सन २०२०-२०२१ पासून प्रथमच महाडीबीटी पोर्टलद्वारे अंमलबजावणी होत आहे . त्या अनुषंगाने योजना व योजनातर्गत घटकांचे पोर्टलवर मॅपीग करणे , पोर्टलवर जिल्हा व तालुका निहाय लक्षांक भरणे पोर्टलबाबतचे प्रशिक्षण देणे व पोर्टलच्या अनुषंगाने तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे , कोविड १९ पैन्डामोकच्या पार्श्वभूमीवर विलंबाने निर्गमित झालेले शासन निर्णय बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ( क्षेत्रातंर्गत / क्षेत्राबाहेरील ) डॉ . बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत लाभार्थ्याची उशिराने निवड होणे या कारणामुळे सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात खर्च पूर्ण होणे अपेक्षित होते . परंतु कोविड १९ पैन्डामोकच्या पार्श्वभूमीवर योजना अंमलबजावणीबाबत ( लॉकडाऊन ) आलेल्या विविध अडचणी या सर्व बाबीमुळे सन २०२०-२०२१ मधील विषयाक्ति योजनातर्गत एकुण ७४६ लाभार्थ्यांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे . यातील सर्व कामे प्रगतीत आहेत. लाभार्थ्यावर झालेल खर्च वगळता शिल्लक राहणारा निधी योजना अंमलबजावणीसाठी उपलब्ध कालावधी पाहता विहीत मुदतीत खर्च होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत . तरी लाभार्थ्याची गैरसोय टाळण्यासाठी सन २०२०-२०२१ या वर्षाचा अखर्चित राहणारा निधी मार्च २०२३ अखेर पर्यंत खर्च करण्यास मान्यता मिळावी अशी मागणी निवेदनाद्वारे करन्यात आली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती गणेश रुपसिंग पराडके उपस्थित होते.