नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, हस्ती पब्लिक स्कूल व हस्ती उद्योग समूह दोंडाईचा जिल्हा धुळे तसेच नंदुरबार जिल्हा शारीरिक शिक्षण संघ व क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित द्वितीय राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारासाठी सार्वजनिक शिक्षण समिती संचलित नंदुरबार येथील श्रीमती हिरीबेन गोविंददास हायस्कूलचे उपमुख्याध्यापक राजेश शाह यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळा अर्जुन पुरस्कार अवार्डी काका पवार, क्रीडा संचालक चंद्रकांत कांबळे, सहसंचालक देविदास गोरे,उपसंचालक सुनंदा पाटील, अध्यक्ष महा. राज्य क्रीडा महासंघ राजेंद्र कोतकर, अध्यक्ष पेफी महाराष्ट्र राज्य डॉ.बळवंत सिंह, चेअरमन हस्ती उद्योग समूह कैलास जैन व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दोंडाईचा जिल्हा धुळे येथे पार पडला. या पुरस्कारासाठी नंदुरबार जिल्ह्यातून शाह यांची निवड झाली आहे. शारीरिक शिक्षकांनी घडवलेल्या खेळाडूंच्या शालेय, राज्य ,राष्ट्रीय तसेच संघटनेच्या राष्ट्रीय कामगिरीच्या प्रमाणपत्र गुणांकन करून गुणांकानुसार हा पुरस्कार दिला जातो हस्ती हा राज्यातील एकमेव पारदर्शक व मानाचा समजला जाणारा पुरस्कार असा आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सार्वजनिक शिक्षण समितीचे अध्यक्ष एडवोकेट रमणभाई शाह सचिव डॉ योगेशभाई देसाई शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह, पर्यवेक्षक जगदीश पाटील, पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया ,शिक्षक ,व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.








