नंदुरबार l प्रतिनिधी
अल्पसंख्यांक विकास व हक्क फाउंडेशन नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी आकिब असलम धोबी यांची करण्यात आली आहे.
अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनची बैठक अध्यक्ष नगरसेवक आरिफ शेख यांच्या घरी पार पडली, यावेळी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सचिव डॉ. मतीन शेख, सहसचिव सगीर मंसूरी, संघटक जावीद अहमद, व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचा विस्ताबाबत चर्चा करण्यात आली.नगरसेवक आरिफ शेख यांची हातो जिल्हा कार्यकारिणी जाहिर केली त्यात नंदुरबार जिल्हाध्यक्ष आकीब असलम धोबीव उत्तर महाराष्ट्र सचिव रियाझ सय्यद यांची नियुक्ती करून नियुक्त पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
आकिब असलम धोबी गेल्या १५ वर्षांपासुन एव्हीएचएफ च्या माध्यातुन सामाजीक कात करीत आहेत. शिक्षण, आरक्षण रोजगार, आरोग्य हक्क,या साठी धरणे आंदोलन करीत सामाजीक कामे केली आहे.तसेच रक्तदान चळवळीचे कार्य करत असल्याने त्यांची निवेड करण्यात आली. अल्पसंख्यांक विकास व हक्क फाऊंडेशनमार्फत समाज हिताचे कामे करण्यात येतील असे आकिब असलम धोबी यांनी सांगीतले.