Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतीच्या वादातुन दोन गटात हाणामारी,परस्पर विरोधी तक्रारीत आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल

team by team
March 23, 2022
in क्राईम
0
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील कात्री येथे शेतातील रस्ता तयार करण्याचा वादातून दोन गटात हाणामारी झाली असून परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली असून याप्रकरणी आठ जणांविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील कात्रीचा आमलीपाडा येथे राहणार्‍या शिवा भिकजी वळवी यांच्या शेतात सुंडया मनसी पाडवी याने शेतात जेसीबी लावून रस्ता बनवत असतांना शिवा वळवी याने याबाबत विचार केली असता त्याचा राग येवून सुंडया पाडवी व इतर तिघांनी शिवा वळवी यांना मारहाण करून शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली म्हणून शिवा भिकजी वळवी यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात सुंडया मनसी पाडवी, दित्या पारसी पाडवी, साया हुजर्‍या पाडवी, वसंत सत्या पाडवी सर्व कात्री ता.धडगांव यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना दिपक वारूळे करीत आहेत.
तर दुसर्‍या घटनेत दिलीप पाडवी यांनी त्यांच्या शेतात रस्ता तयार करण्यासाठी जेसीबी मागविले होते. त्याला शिवा वळवी याने विरोध केला. यावेळी दिलीप पाडवी हे समजविण्यात गेले असता शिवा भिकजी वळवी व इतर तिघांनी दिलीप पाडवी व उषाबाई पाडवी तसेच बिरबा पाडवी यांना मारहाण करून दुखापत केली. तसेच शेतात पाय ठेवल तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली म्हणून दिलीप मानसी पाडवी यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात शिवा भिकजी वळवी, काकडया भिकजी वळवी, पिसा जेगल्या वळवी, गुला काकडया वळवी सर्व रा.कात्री ता.धडगांव यांच्या विरूध्द भादंवि कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास स्वप्निल गोसावी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्हास्तरीय आदर्श ग्रामसेवकांची पुरस्कारासाठी निवड

Next Post

नंदुरबारात शहरात घरफोडीत १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास

Next Post
होळीच्या दांडयाचा शेंडा कापल्याप्रकरणी पती पत्नीस मारहाण

नंदुरबारात शहरात घरफोडीत १ लाख १० हजाराचा मुद्देमाल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add