नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार येथे लहान मुलांचे लैंगिक शोषण बाबतचा असभ्य, अश्लिल प्रदर्शन असलेली चित्रफित सोशल मिडीयावरुन प्रसारीत केल्याप्रकरणी तिघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील वर्धमान नगर येथील तुषार विलास पाटील, हसनखान व एका विधीसंघर्ष बालकाने मोबाईल हॅण्डसेटमध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषणबाबतचा असभ्य, अश्लिल प्रदर्शन असलेला व्हिडीओ स्वत: पाहून सोशल मिडीयाच्या इन्ट्राग्रामवर प्रसारीत केला. याप्रकरणी सायबर सेलचे कन्हैय्यालाल पाटील यांच्या फिर्यादीवरुन तिघा संशयितांविरोधात नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ७६ (ब) सह पोक्सो कायदा २०१२ चे कलम ११ (४) चे उल्लंघन कलम १२ व १३ (अ) (क), १४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित तुषार पाटील यास अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अर्जुन पटले करीत आहेत.