नंदुरबार ! प्रतिनिधी
जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती ९ जुलै रोजी दुपारी अडीच वाजता झूम ॲपवर वेबिनार आयोजित करण्यात आले आहे .
जिल्ह्यातील मागासवर्गीय उमेदवारांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीकरिता सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यरत असून बारावी विज्ञान तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील मागासवर्गीय विद्यार्थी , अधिकारी व कर्मचारी तसेच मागास प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना समितीमार्फत जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयीन गर्दी कमी करून अर्जदारांना दि.१ ऑगस्ट २०२० पासून ऑनलाइन पद्धतीने वैधता प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ; मात्र अर्जदारांना अर्ज करताना अनेक अडचणी येतात . त्यामुळे दि. २९ जुलै रोजी वेबिनारच्या माध्यमातून जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कामकाजात येणाऱ्या अडीअडचणींबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे . हे वेबिनार झूम ॲपवर होणार असून मीटिंगचा आयडी २०१६७२१३५५ व पासवर्ड क्यूएक्सक्यूएमशून्य डब्ल्यू ( QxqMOW ) असा आहे . तरी प्राचार्य , कर्मचारी , मुख्याध्यापक , विद्यार्थी , पालक , इंटरनेट कॅफे व्यावसायिकांनी या वेबिनारमध्ये सहभागी व्हावे . जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्जदारांनी अर्ज दाखल करावेत , असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य सचिव राकेश पाटील यांनी केले आहे .