नंदुरबार !प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील करण चौफुली येथे स्वीफ्ट कारमधुन विक्रीसाठी गांजा वाहतुक करतांना दोंडाईचातील दोघांना नंदुरबार स्थानिक गुन्हा – अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले . त्यांच्याकडुन ४० हजाराचा पाच किलो सुका गांजा जप्त केला असून दोघांविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नंदुरबार शहरातील करण चौफुलीवर दोन जण स्वीफ्ट गाडीने ( क्र.एम.एच .४० डी.झेड .४६२४ ) गांजाची वाहतुक करीत होते . यावेळी पोलीसांनी दोघांना पकडुन ४० हजाराचा पाच किलो सुका गांजा जप्त केला आहे . हे दोघेही संशयित दोंडाईचा येथुन नंदुरबारमार्गे गांजा वाहतुक करीत होते . यावेळी नंदुरबार एलसीबीच्या पोलीसांनी गांजासह गाडी ताब्यात घेवुन दोन्ही संशयितांना अटक केली आहे . याबाबत पोना.जितेंद्र सुभाष अहिरराव नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार सोनु किशोर कोळी , सागर विजय सूर्यवंशी ( रा.म्हाळसानगर दोंडाईचा ) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढील तपास शहर पोलिस निरीक्षक अर्जुन पटले करीत आहेत