नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील कल्याणी पार्क मध्ये दरवाज्याचे कुलुप तोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत दागिन्यांसह रोकड असा ५५ हजाराचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली . याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार येथील कल्याणी पार्कमध्ये अनिल जगन भुसनार यांच्या मातोश्री राहतात . हे घर बंद असतांना चोरट्यांनी संधी साधत दरवाज्याचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला . गोदरेज कपाटातुन ३५ हजाराची रोकड व २० हजाराचे दोन कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकुण ५५ हजाराचा ऐवज चोरुन नेला आहे . याबाबत अनिल भुसनार यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार अनोळखीविरुध्द भादंवि कलम ३८० , ४५४ , ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तपास पोना . स्वप्निल पगारे करीत आहेत .