नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार नगर परिषद मालमत्ता करवसुली आढावा बैठकीस गैरकायदेशिर व्यक्तीची उपस्थिती प्रकरणी प्रभारी नगराध्यक्ष कुणाल बटेसिंग वसावे यांना अपात्र करण्याबाबतचे निवेदन नगरसेवक निलेश पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,नगर परिषद मालमत्ता कर वसुली आढावा बैठक प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी प्रभारी नगराध्यक्षाचा उपस्थितीत दि.26 फेब्रुवारी 2022 रोजी आयोजित केली होती. परंतु या बैठकीस घटनाबाह्य व न.पा. सभागृहाचे सदस्य नसलेले व न.पा.त मतदार नसतांना चंद्रकांत रघुवंशी यांनी बैठकीत सुचना केल्या होत्या.याप्रकरणी विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तक्रार दाखल केल्यामुळे मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांना आमंत्रित केल्याचा खुलासा केला आहे. प्रत्यक्षात न.पा.च्या बैठकीस घटनाबाह्य व्यक्तीस आमंत्रित करण्यासाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांची मंजुरी आवश्यक असतांना सुद्धा गैरकायदेशिररित्या घटनाबाह्य व्यक्तीस आमंत्रित केल्याप्रकरणी नगर पंचायत अधिनियम 1965 च्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभारी नगराध्यक्ष कुणाल बटेसिंग वसावे यांना अपात्र करण्याबाबत कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक निलेश पाडवी यांनी केली आहे.