सारंगखेडा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी येथे बेकायदेशिर गावठी हातभट्टीची दारुची भट्टी लावून दारू तयार करणाऱ्यां एका विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत ११ हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
पोलीस अधीक्षक, पी आर पाटील यांनी आदेशीत केल्याने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तात्काळ सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीतील वडाळी येथे स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार किरण मोरे, विकास कापुरे, अविनाश चव्हाण सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या पथकाने काल सकाळी वडाळी येवून भट्टी लावून दारू तयार करणाऱ्यास जागिच पकडून मुद्देमालासह जप्त करून कार्यवाही करण्यात आली आहे. यात वडाळी येथे ११ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाला सह दिनेश कालु पवार याचा वर कारवाई करण्यात आली आहे .याबाबत या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिर गावठी हात भट्टी सुरु असल्याची तक्रार होती .