म्हसावद l प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ कार्यक्रम अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका जाम ग्रामपंचायत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन योजनांची प्रशासकीय आराखङा मान्यता देण्यात आल्या.
पंचायत समिती शहादा स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) विभाग तर्फे गावातील सार्वजनिक ठिकाणी होत असलेले सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन ठिकाणी सर्वे करुन कामाची सुरवात करण्यात आले. केंद्र पुरस्कृत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत ग्रामीण भागातील दर्जा सुधारने है उददिष्ट आहे. या साठि गावातील घनकचरा व सांडपाणी हा महत्वाचा घटक आहे. सदर या योजन अंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे / सार्वजनिक ठिकाणी कंपोस्ट टाकी व गावातील लाभार्थीनसाठी वैयक्तिक शोषखड्डे देखील घेण्यात येईल याची नोंद घ्यावी.
या वेळी सरपंच ईश्वर वाघ , ग्रामसेवक नारायण पवार स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभाग उ. अभियंता बी. बी. रावसाहेब सदस्य पूणम चव्हाण , अनिल चव्हाण , सुभाष वाघ , पो पाटिल नवल चव्हाण , विशाल चव्हाण , प्रशांत पवार , अमरसिंग चव्हाण आदि ग्रामस्थ उपस्थित होते.