Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

team by team
March 15, 2022
in कृषी
0
जिल्ह्यातील तापमानाचा पारा पुढील काही दिवस  अजून वाढणार, ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याच्या उत्तर आणि पश्चिमेकडील भागातून उष्ण आणि कोरडे वारे वाहत असून तापमानात अचानक वाढ झाल्याचे दिसून येत असून पुढील काही दिवस तापमान जास्त राहील अशी माहिती कृषि विज्ञान केंद्राचे कृषि हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली आहे. पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होऊन पारा ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तापमानात अचानक वाढ झाल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. तापमानात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुग, बाजरी, मुग, तीळ, आदी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार पाणी देण्याची व्यवस्था करावी. पाणी देण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. त्यामुळे पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. फळ झाडांच्या बुंध्याभोवती गवताचे आच्छादन किंवा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा. यामुळे मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त वेळ टिकून राहील. फळधारणा अवस्थेत
असलेल्या आंबा, केळी व पपईसारख्या फळांचे उन्हापासून बचाव करण्यासाठी पिशवीने फळे झाकून घ्यावीत. वाढत्या उष्णतेपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी जनावरांना ताजे, स्वच्छ व थंड पाणी मुबलक प्रमाणात द्यावे. जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित राहण्यासाठी दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर थंड पाणी शिंपडावे किंवा पोते पाण्याने भिजवून शरीरावर बांधावे. यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होईल. दरम्यान पुढील दोन दिवस विशेषतः दुपारी ११ ते ४ या काळात थेट उन्हात जाणे टाळावे, शरीराचे तापमान ठेवण्याचा प्रयत्न कारावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेऊन मुबलक प्रमाणात पाणी प्यावे, अशी माहिती नंदुरबार जिल्हा कृषि हवामान केंद्र, डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रहार शिक्षक संघटनेचे प्राथ.शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन

Next Post

नंदुरबार व नवापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
बिलगाव येथे महिलेस लाकडाने डोक्यावर मारुन दुखापत, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार व नवापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add