Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या पालिकेची चौकशी करावी : भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत

team by team
March 13, 2022
in राजकीय
0
नवापूर शहरातील नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या  पालिकेची चौकशी करावी : भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत

नवापूर | प्रतिनिधी
नवापूर शहरातील दोन ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्यासाठी सोनगढ अग्निशमनचे थकित बील पालिकेने त्वरित अदा करावे,शहरातील सोलर पथदिव्यांची दुरूस्ती करावी, महाविकास आघाडीचे सरकार असून शहरातील विकास खुंटला असुन पालिकेच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असुन शहरातील सामान्य नागरीकांच्या जीवाशी खेळणार्‍या नवापूर पालिकेची तात्त्काल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजप तालुक्याध्यक्ष भरत गावीत यांनी केली.
नवापूर येथे पालिकेच्या भोंगळ कारभाराविरूध्द त्यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पुढे भरत गावीत म्हणाले कि, नवापुर नगरपालिका कार्यशुन्य कामचुकारपणा बाबत आम्ही लेखी पत्राव्दारे विनंती. प्रत्यक्ष भेट्न तसे वारंवार आंदोलन मोर्चा उपोषण केले. याला प्रशासनाने केराची टोपली दाखवुन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
५ मार्च २०२२ रोजी नवापूर शहरातील मुख्य लाईट बाजारमधील पिठ गिरणीस आग लागली त्यावेळेस नवापूर पालिकेतील वरीष्ठ अधिकार्‍याने सोनगढ नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला दुरध्वनी करुन संपर्क केला.मात्र सोनगढ नगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे बिल नवापुर नगरपालिकेने अदा केलेले नसल्याने अग्निशमन बंब पाठवला नाही. त्यानंतर व्यारा नगरपालिकेशी संपर्क साधून अग्निशमन बंब मागविण्यात आला होता. बिल अदा न केल्याने सोनगढ़ अग्निबंब वेळेवर उपलब्ध होऊ शकला नाही जर, नवापुर नगरपालिकेने वेळेवर बिल अदा केले असते तर सोनगढ नगरपालिकेचा अग्निशम बंब २० मीनिटात उपलब्ध झाला असता तर पिठगिरणी मालक बदुडा यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले नसते केवळ बील न भरल्याने व्याराचा अग्निशमन बंब ४० मीनीटांनी उपलब्ध झाल्याने आग विझवायला उशीर झाला.
नवापुर पालिकेचे मुख्याधिकारी व लोकप्रतिनी शहरचा विकास कामांच्या मोठ-मोठया गोष्टी करून नागरीकांना भुलाथापा मारणार्‍या पालिकेचा भोंगळ कार्यशुन्य कारभार पुन्हा स्पष्ट दिसून येत आहे. तरी संबंधित पालिकेचे बिल वेळेवर का अदा केले नाही या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. नवापूर शहरात अनेक समस्या असून पालिका प्रशासन त्या कडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे.
शहरातील सोलर पथदिव्यांची दुरावस्था झाली असून कित्येक पथदिवे बंद आढळून येत आहेत.पाणीपुरवठा केंद्राजवळच दूषित पाणी देखील जमा होत आहेत यामुळेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीची रक्कम साठी चकरा माराव्या लागत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असून शहराचा विकास होत नाही असा आरोप करीत भरत गावित यांनी पालिका फंडाचा योग्य वापर करण्याची मागणी पत्रकार परिषदेत केली.या प्रसंगी नगरसेवक महेंद्र दुसाणे ,शहराध्यक्ष प्रणव सोनार, जयंतीलाल अग्रवाल, अजय गावीत ,जाकीर पठाण, स्वप्नील मिस्री,दिनेश चौधरी आदीं उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

१३ लाख ९५ हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई, दोघांना अटक

Next Post

चिपलीपाडा येथे भिलिस्थान लायनसेनेचा मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण

Next Post
चिपलीपाडा येथे भिलिस्थान लायनसेनेचा मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण

चिपलीपाडा येथे भिलिस्थान लायनसेनेचा मान्यवरांच्या उपस्थितीत फलक अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add