नंदुरबार | प्रतिनिधी
म्हसावद ते धडगांव रोडवर उनपदेव फाट्याजवळ १३ लाख ९५ हजार रुपये किमंतीची बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर म्हसावद पोलीसांची धडक कारवाई करीत दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि,नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना खात्रीशीर बातमी मिळाली की,दि.१३ मार्च रोजी मध्यरात्री पिंप्री – म्हसावद मार्गे धडगांव येथे एका पांढर्या रंगाच्या चारचाकी पिकअप या वाहनामधून अवैध देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक होणार आहे . त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना सदर माहिती कळवुन तात्काळ कारवाई करणेबाबत आदेशीत केले . म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सुनिल बिर्हाडे व पोलीस अमलदारांचे एक पथक तयार केले . म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाने म्हसावद ते धडगांव रोडवर उनपदेव फाट्याजवळ सापळा लावला . साधारणपणे 0.३० वा . सुमारास म्हसावद गावाकडुन धडगांव गावाकडे एक चारचाकी पिकअप वाहन येतांना दिसले म्हणून पथकातील अमंलदारांनी त्यास हाताने व बॅटरीच्या सहाय्याने उभे करण्याचा इशारा देवून वाहन थांबविले . त्यास म्हसावद पोलीसांनी आपली ओळख देवून वाहन चालकास वाहनात काय आहे बाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली म्हणून म्हसावद पोलीस ठाण्याच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी वाहनाच्या मागील बाजुची पाहणी केली असता खाकी रंगाचे पृष्ठाचे खोके ठेवलेले मिळुन आले . ते खोके उघडून पाहिले असता त्यामध्ये दारू आढळून आली . ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना दारु वाहतुकीचा परवाना आहे काय ? असे विचारले असता त्याचेकडे दारु वाहतुकीचा परवाना नसल्याचे समजले . तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांना सदरचा माल कोणाकडून आणला ? व कोठे घेऊन जात आहे याबाबत विचारले असता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तरे दिली नाही . सदर खोके उघडून पाहिले असता त्यात ८ लाख ७८ हजार ४०० रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण १८३ बॉक्स व त्यामध्ये ८७८४ सिलबंद बाटल्या , १२ हजार ६०० रुपये किमंतीची रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्कीच्या १८० एम . एल . चे एकुण १२६ सिलबंद प्लास्टीकच्या बाटल्या, ४ हजार २९० रुपये किमंतीची बॉम्बे व्हिस्कीच्या १८० एम.एल.चे एकुण ३३ सिलबंद प्लास्टीकच्या बाटल्या, ५ लाख रुपये किमतीचे एक पांढर्या रंगाचे े पिकअप वाहन (एम.एच.०४, डि.एस.६४०२) असा नंबर असलेले असा एकुण १३ लाख ९५ हजार २९० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन म्हसावद पोलीस ठाणे येथे हिमंत रोहिदास पवार रा . बिलगांव ता . धडगांव, खिमजी रमसिया राठोड रा. केलदी किमला पो . बखतगड ता . सांडवा जि . अलिराजपुर मध्य प्रदेश यांच्याविरुध्द् महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन दोन्ही संशयीत आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे व गुन्ह्याचा तपास सुरु आहे . सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी शहादा श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार , पोलीस उप निरीक्षक सुनिल बिर्हाडे , असई गुलाब पावरा , पोलीस हवालदार भिमसिंग ठाकरे , सुनिल बागुल , काशिनाथ साळवे , पोलीस नाईक घनश्याम सुर्यवंशी , सचिन तावडे यांचे पथकाने केली असुन पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे .