तळोदा l प्रतिनिधी
राज्यातील माहाविकास आघाडी सरकार ची भ्रष्ट्राचारी कार्य शैली तथा दहशतवादी विचारसरणीच्या मंत्र्यांना पाठबळ देणे याबाबत राज्यसरकार कोंडीत सापडले आहे.त्यात अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनाम्याची मागणी जोर धरुन आहे. त्यातच मनी ट्रान्स्फर घोटाळा विधानभवनात उघड करणारे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनाच राज्य गृह मंत्रालय यांच्या आदेशाने सुड बुद्धी ने केवळ आकसा पोटी जबाब नोंद साठी सायबर गुन्हे विभाग ,मुंबई यांनी नोटीस बजावली आहे.ज्यांनी पुरावा सह घोटाळा उघडकीस आणला त्यांचीच चौकशी व जाब जबानी घेणे हे राज्य सरकारचे धोरण चुकीचे व तथ्यहीन असून त्याविरोधात आज तळोदा शहरात मंडल अध्यक्ष योगेश प्रभाकर चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीचे दहन स्मारक चौक येथे सकाळी ठीक ११ वाजता करण्यात आले.यावेळी राज्य सरकार चा निषेध म्हणून घोषणा देत सरकार व त्यांच्या भ्रष्ट्राचाराला खत पाणी देणाऱ्या विचारचरणी विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंह राजपुत, जिल्हा चिटणीस हेमलाल मगरे, पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे,विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे,जी. प सदस्य प्रकाश वळवी, प.स.सदस्य विक्रम पाडवी,आदिवासी आघाडीचे दारासिंग वसावे, दरबारसिंग वसावे,जिल्हा ओ बी सी मोर्चा अध्यक्ष प्रदीप शेंडे, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष दिपक चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी,युवा मोर्चाचे योगेश चव्हाण,तालुका उपाध्यक्ष रसिला बेन देसाई,जिल्हा पदाधिकारी प्रज्ञा कुलकर्णी,उपाध्यक्ष राजकपूर मगरे, पदाधिकारी संजय परदेशी,कोषाध्यक्ष अरविंद प्रधान,सोशल मीडिया प्रमुख अनिल परदेशी,कामगार आघाडीचे संजू पाडवी,व्यापारी आघाडीचे दिपक कलाल,उपाध्यक्ष ईश्वर पाडवी,अनुसूचित जाती मोर्चाचे अंबालाल साठे, अ.जाती मोर्चा शहर अध्यक्ष जीवन आहीरे,सामाजिक कार्यकर्ता कल्पेश चौधरी,आत्मनिर्भर संघटनेचे घनश्याम कलाल,अनुसूचित जाती मोर्चा पदाधिकारी संजय चावडा, चिटणीस गोकुळ पवार, किसान आघाडीचे संजय माळी, रोझवाचे सरपंच कैलास पाडवी,गोपाळपूर चे दशरथ पाडवी, चीनोदा सरपंच राजेंद्र पाडवी, दसवड चे शक्तिकेन्द्र पूनमचंद ठाकरे,शहर उपाध्यक्ष रमेश पाटील, धनंजय पाडवी, गबा आहिरे, आदीं समवेत कार्यकर्ते उपस्थित होते.