नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे मित्राला उसनवार ५० हजार दिले मित्राने चेक दिला मात्र तो बाऊन्स झाला. या प्रकरणी आरोपीस न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि 1 ऑक्टोंबर 2018 रोजी किरण अंबर पाटील राज.नंदुरबार यांनी नंदूरबार येथील व्यायालयात फिर्याद दाखल केली की , हरिष किसनचंद कुकरेजा याच्याशी मित्रत्वाचे संबंध असल्याने हरिष यास घरगुती कामासाठी 50 हजाराची गरज असल्याने त्याने किरण यांच्याकडून जुन 2018 मध्ये 50 हजार हात उसणावर मागितले . मित्रत्वाचे संबंध लक्षात घेऊन किरण याने हरिष यास र50 हजार काही महीण्यांच्या मुदतीवर दिले . मुदत संपल्यावर किरण याने हरीष याच्याकडे रकमेची मागणी केली असता हरीष याने किरण पाटील यास 50 हजाराचा चेक दिला . सदर चेक किरण याने त्याच्या खाते असलेल्या बँकेत वटविण्यासाठी टाकला असता सदर चेक अनादर झाला तसा मेमो किरण यास मिळाला . किरण याने सदर बाबतीत त्याचे वकिल सुशिल गवळी यांचे मार्फत हरीष यास कायदेशीर नोटीस दिली . सदर नोटीस मिळुनही हरीष याने वरील चेकची रक्कम किरण यास दिली नाही . पुढील कार्यवाही म्हणुन किरण याने नंदुरबार न्यायालयात हरिष कुकरेजा याच्याविरुध्द चेक अनादर झाल्याबाबत खटला दाखल केला . सदर खटल्यात किरण याची महत्वपुर्ण साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली . फिर्यादी किरण याचे आरोपी हरीष किसनचंद कुकरेजा याच्याकडे 50 हजार कायदेशीर घेणे आहे ही बाब न्यायायालात सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने हरीष कुकरेजा यास चेक अनादर झाला म्हणुन चलनक्षम दस्ताएवजाचा कायदा कलम 138 प्रमाणे दोषी धरले व आरोपी हरीष यास दोन महिन्यांचा कारावास व 63 हजार 500 रुपये दंड फिर्यादीस देण्याचा आदेश न्यायाधिश एन . बी . पाटील यांनी दिला . सदर खटल्याचे कामी फिर्यादी किरण अंबर पाटील यांच्या तर्फे त्याचे वकिल ॲड सुशिल . व्ही . गवळी यांनी युक्तीवाद केला .