Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्पर्धा परीक्षा संघर्षाचा मार्ग : डॉ.जी. एम. मोरे

team by team
March 12, 2022
in शैक्षणिक
0
स्पर्धा परीक्षा संघर्षाचा मार्ग : डॉ.जी. एम. मोरे

म्हसावद l प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तळोदा यांच्या विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या बौद्धिक सत्रात “स्पर्धा परीक्षा आणि आजचा तरुण ” या विषयावर डॉ.जी. एम. मोरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. जी. एम. मोरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये युवकांनी जो करियरसाठी प्रशासकीय सेवेचा मार्ग मार्ग निवडला आहे तो प्रतिष्ठेचा असला तरी त्या मार्गात अनेक संघर्षात्मक प्रसंग असल्याचे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देताना अशा आव्हानात्मक संघर्षाला धैर्याने सामोरे गेले पाहिजे आणि आपले उचित ध्येय साध्य केले पाहिजे असे त्यांनी आपल्या मनोगतामधुन व्यक्त केले. प्रत्येक विद्यार्थ्यांनी कुठल्याही करिअरचा मार्ग निवडताना आपल्या स्वतःचे अँनलीसीस करायला हवे. याआधारे युवकांना योग्य तो मार्ग निवडायला मदत होते तसेच आपल्यातील सामर्थ्य व कमतरता यांची माहिती होत असल्याने आव्हानांवर मात करून विजयाचा मार्ग सर करण्यास मदत होते असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आल्यास खचून न जाता आपला बी प्लान देखील निश्चित केलेला असावा असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी स्वयंसेवकांनी स्पर्धा परीक्षेसंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पी एल सोनवणे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. पी.व्ही तट्टे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. सुनिता गायकवाड यासह शिबिरार्थि स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी रोशनी कोळी हिने केले तर आभार श्रुती शहा हिने केले.

बातमी शेअर करा
Previous Post

बामखेडा कला महाविद्यालयात व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमाला

Next Post

वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

Next Post
वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

वन्यजीव संस्थेने दिले माणुसकीचे दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add