Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वीजपुरवठा 14 मार्च नंतर होणार खंडित महावितरणचा निर्वाणीचा इशारा, ४६ लाखांचे वीजबिल थकीत

team by team
March 11, 2022
in राज्य
0
महावितरणतर्फे तालुकास्तरावर वीजबिल दुरुस्ती शिबिराचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जवळपास ४६ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. महावितरणने वारंवार पाठपुरावा करूनही रुग्णालयाने थकबाकी भरलेली नाही. त्यामुळे १४ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास नाईलाजास्तव रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे महावितरणने म्हटले आहे.
कोविडच्या संकटातही महावितरणने नागरिकांसह सर्व रुग्णालये व अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा केला. यात कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या शासकीय व खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे. तेथे वीजपुरवठा खंडित होणार नाही याची महावितरणने पूर्णपणे काळजी घेतली. त्यामुळे वीजपुरवठा खंडित न करता थकबाकी भरण्यासाठी संबंधित रुग्णालयांच्या प्रशासनाकडे महावितरण वारंवार पाठपुरावा करत आहे. मात्र रुग्णालयांनी बिलांची थकबाकी भरलेली नाही.
नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जानेवारी-२०२२ अखेर ५० लाख ७६ हजार ३२० रुपये वीजबिल थकीत आहे. त्यातील केवळ ५ लाख रुपये नुकतेच भरण्यात आले आहेत. आता आणखी ४५ लाख ७६ हजार ३२० रुपये बाकी आहेत. याबाबत महावितरणच्या जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी रुग्णालय प्रशासनास पत्र लिहून वीजबिलाची पूर्ण थकबाकी भरण्याचे आवाहन केले होते. थकबाकी भरण्यासंदर्भात १८ डिसेंबर २०२१ व १७ फेब्रुवारी २०२२ रोजी नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही संबंधितांकडून कोणताही योग्य प्रतिसाद प्राप्त झालेला नाही. कोविड-१९ आपत्तीमुळे महावितरण कंपनीची आर्थिक स्थिती बिकट असून, थकबाकी वसूल करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात थकबाकी ठेवणे शक्य नसल्याने आपल्या स्तरावर योग्य तो पाठपुरावा करून थकबाकी भरण्याची व्यवस्था करावी. अन्यथा कंपनी नियमाप्रमाणे कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला होता. तसेच अधीक्षक अभियंता अनिल बोरसे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची २२ फेब्रुवारीला प्रत्यक्ष भेट घेऊन बिल भरण्याची विनंती केली होती.
तथापि, महावितरणच्या आवाहनाला संबंधितांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे १४ मार्च रोजी सकाळी १० वाजेपर्यंत थकबाकी न भरल्यास रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, असे महावितरणने १० मार्च रोजी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपाला चार राज्यात निवडणुकीत यश मिळाल्याने नंदुरबार येथे आनंदोत्सव साजरा

Next Post

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post
शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add