नंदूरबार l प्रतिनिधी
उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणीपूर या चार राज्यात निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्याने नंदुरबार शहरातील अहिंसा चौक येथे ढोल-ताशे वाजवित, एकमेकांना पेढे भरवित भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबारतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करताना भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, युवा मोर्चा सदस्य किरण वाडीले, प्रकाश चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.








