नंदुरबार l प्रतिनिधी
येथील युनियन बँक ऑफ इंडिया (शाखा जिल्हाधिकारी कार्यालय) नंदुरबारतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ९००० वृक्षारोपण व वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
युनियन बँक नाशिक क्षेत्रचे उपमहाप्रबंधक गिरीजा भुषण मिश्रा, सहाय्यक महाप्रबधक संजय लाकरा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्ष रथ बनवून हिरवा झेंडा दाखविण्यात आला. नंदुरबार जिल्हा परिषदच्या अध्यक्षा ॲड. सीमा वळवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्ष रथातून गावोगावी जाऊन नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात येत आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया (जिल्हाधिकारी शाखा) नंदुरबारचे शाखेचे व्यवस्थापक राहुल व्यास यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. युनियन बँक शाखा नंदुरबारचे व्यवस्थापन भटू ठाकुर, उप शाखाप्रबंधक रश्मी सराफ, कॅशियर प्राची पिंपळे, न्यू बळीराजा रोप वाटिकाचे संचालक नितीन अमृत पाटील व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.