नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून हवामानात मोठे बदल झाल्याने गेली चार दिवसापासून गारपीट अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. आज दि.१० मार्च रोजी दुपारनंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे अवकाळी पावसाने हजेरी लावली.
फेब्रुवारी महिन्यात या परिसरात थंडीने तळ गाठला होता. यंदा ३ डिग्री सेल्सियस पेक्षा कमी तापमान झाल्याने हिमवृष्टी पाहायला मिळाली होती.आज झालेल्या बेमोसमी पावसामुळे तोरणमाळ करांना गारवा अनुभवायला मिळाला. अवकाळी पावसासोबत काही प्रमाणात गारपीट देखील पाहावयाला मिळाली.