नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथील ओमकार योग स्टूडियोतर्फे महिला दिनानिमित्त महिलांना योगाचे महत्व समजावीत योगा वर आधारित एका नृत्यचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमात ओमकार योग स्टुडिओ च्या संचालिका योग विशारद सौ. प्राची अग्रवाल यांनी यावेळी महिलांना योगा चे महत्व पटवून दिले.
तसेच त्यांच्या विद्यार्थिनी श्वेता धोका यांनी योगा वर कविता सादर केली. त्या नंतर क्लासच्या विद्यार्थीनिनी योगा वर आधारित एका सुंदर डान्स चे सादरीकरण केले.कार्यक्रमाला अनेक पालक उपस्थित होते.यावेळी जयप्रकाश मेडिकलचे संचालक राजेंद्र अग्रवाल यांनी महिलांचा सत्कार केला व सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या.