Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

team by team
March 10, 2022
in क्राईम
0
पोलीस दलाच्या मोटार सायकल रॅलीने नंदुरबारकरांचे वेधले लक्ष

नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त देशासह राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर .पाटील यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅली आयोजित केली होती . महिलांना सन्मान मिळण्याबरोबरच हेल्मेट वापराबाबत जनजागृती करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता .


सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी , नंदुरबार सचिन हिरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे १२५ महिला पोलीस अधिकारी व महिला अर्मलदार हेल्मेटसह सहभागी झाले होते . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांची मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती . सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला . सदर मोटार सायकल रॅलीला सायंकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास प्रांत अधिकारी तथा जिल्हा प्रकल्प अधिकारी मिनल करनवाल यांनी हिरवा झेंडा दाखविला मोटार सायकल रॅली समोर पोलीस बॅड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून लोकांमध्ये व रॅलीमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण केले . सदरची रैली ही पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथुन निघून नवापुर चौफुली , साक्री नाका , सोनार खुंट हाट दरवाजा , सिंधी कॉलनी , पेट्रोल पंप व तेथुन गांधी पुतळा , नेहरु पुतळा , नगर पालिका , आंधारे चौक , धुळे चौफुली , नवापुर चौफुली व पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालय या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले व पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे सदर रॅलीचे समापण झाले . महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांच्या रॅलीने नंदुरबार वासीयांचे लक्ष वेधून महिला शक्तीचे प्रदर्शन केले . महिला पोलीस अधिकारी व अमलदार यांनी काढलेल्या मोटार सायकल रैलीने महिलांना जणू काही एक प्रकारे सुरक्षेची हमी दिली . सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना आजूबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते . पोलीस मुख्यालयात सद्या हेल्मेट सक्ती अनिवार्य केल्यामुळे सर्व पोलीस सद्या हेल्मेट परिधान करीत आहेत . तसेच मोटार सायकल रॅलीतील महिला पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांनी हेल्मेट परिधान करून आपल्या जीवनात दुचाकी चालवितांना प्रत्येक नागरिकाला हेल्मेटचे महत्व लक्षात आणून दिले तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन देखील पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी केले . यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे १२५ महिला पोलीस अधिकारी व महिला अमंलदार हे हेल्मेटसह रैलीला उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक अनावरण व मार्गदर्शन शिबिर

Next Post

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

Next Post
महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला कोरोना योद्यांचा करण्यात आला सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add