धडगांव| प्रतिनिधी
धनाजे खु. ता. धडगाव येथे तालुक्यातील ५७ गावातील ५७ महिला बचत गटांना ५७ पिठाची गिरणी वाटप करण्यात आल्या.
धडगाव तालुक्यातील धनाजे खु.येथे तालुक्यातील ५७ गावातील ५७ महिला बचत गटांना ५७ पिठाची गिरणी खा.डॉ. हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.यावेळी माजी जि. प. अध्यक्ष सौ.कुमुदिनी गावित,डॉ.सुप्रिया गावित,भाजपा तालुका अध्यक्ष अरुण वळवी,शिवाजी पराडके,माजी जि.प.सदस्य निलिमा पावरा,सरपंच गृ.ग्रा.धनाजे डॉ.करमचंद,मा.जि. प.सदस्य योगिताग वळवी, जामसिंग पावरा ग्रा.प.सदस्य,नितेश वळवी व सर्व ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.