- शहादा ! प्रतिनिधी
२१ जून जागतिक योग दिनानिमित्त येथील ए.के.मार्शल आर्ट्स ऍकडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे योगसने केली.
व्यायाम केल्याने रोग प्रतिकारक शक्ति वाढते व शरीर तंदुरुस्त आणि मन ताजेवान राहते. लॉकडॉउनच्या बंद काळानंतर मैदानावर आलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर स्फूर्ती व उत्साह दिसून आला. यात लावण्या पुरुषोत्तम पवार, पर्णवी खगेंद्र कुंभार, राशि कल्पेश जैन, स्वरा प्रशांत मोरे, तेजस्वी शिरीष जयस्वाल, खुशी पुरुषोत्तम पवार, निवेदिका जगदीश जयस्वाल, पलक संदेश जैन, यशस्वी शिरीष जयस्वाल, कार्तिक प्रशांत मोरे, सक्षम कल्पेश जैन, वरद विष्णु गरकळ, गौरव खगेंद्र कुंभार, ओम रविंद्र सुर्यवंशी, साई प्रमोद पाटील, गौरव सुरेश सुर्यवंशी यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक शुभम कर्मा व मुख्य प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे यांनी मार्गदर्शन केले.