तळोदा l प्रतिनिधी
युक्रेन रशिया मध्ये चालत असलेल्या युद्ध परिस्थितित जिल्ह्यातील ९ विद्यार्थी अडकले होते.पैकी ३ जण सुखरूप मायदेशी परतले तर तळोदा शहरातील कौस्तुभ गवळी हा रविवारी तो आपल्या घरी सुखरूप परतला.यावेळी त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला व पेढे भरवून गोड तोंड केले तसेच मायदेशी येत असतांना प्रवासातील त्यांचे अनुभव कथन एकूण घेतले.
नंदूरबार जिल्ह्यातील 9 विद्यार्थी युक्रेन येथे अडकले होते.पैकी तीन विद्यार्थी परतले तर तळोदा येथील कौस्तुभ गवली रविवारी तळोदा शहरात दाखल झाला.कौस्तुभ याने २ मार्चला युक्रेन बॉर्डर सोडली होती. मालदोव्हा बॉर्डरवर त्याच्यासोबत भारतीय दूतावासाने संपर्क केला होता. तेथून इतर भारतीय विद्यार्थ्यांसोबत तो रोमनियाची राजधानी बुखारेस्ट येथे आला होता. तेथून दिल्ली येथे आल्यानंतर रविवारी तो तळोद्यातील आपल्या घरी परतला. यावेळी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. यावेळी सोबत आई डॉ.रेखा शिंदे,मनवर पिंजारी,शहर अध्यक्ष योगेश मराठे,बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय,नगरसेविका अनिता परदेशीं,कृ.उ.बा.स.संचालक भरत चौधरी,युवा नेता संदीप परदेशीं,खजिनदार धर्मराज पवार आदी उपस्थित होते. यावेळी त्याच्या कुटुंबीयांकडून केंद्र सरकार, भारतीय दूतावासाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. कौस्तुभ याने सोशल मिडियातून युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली होती.








