नंदुरबार l प्रतिनिधी
पक्षीय राजकारण विसरून जनतेच्या विकासासाठी एकत्र येऊ असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तिलाली गावात जनसुविधा योजना व अभिसरण वित्त आयोग तसेच डीपीडीसी अंतर्गत नवीन विद्युत रोहित्र व शुद्ध पाणीपुरवठा प्लांटसह विविध विकास कामांचे उद्घाटन रविवारी माजी आ.रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी,जि.प सदस्य प्रतिनिधी डॉ.सयाजीराव मोरे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,जि.प सदस्य देवमन पवार,पं.स उपसभापती कमलेश महाले,जि.प सदस्य प्रतिनिधी सुरेश शिंत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील, एनटीव्हीएसचे संचालक संतोष पाटील,पं.स तेजस पवार,धर्मेंद्र परदेशी,तिलालीच्या सरपंच वंदना सावंत,प्राचार्य डॉ.सि.पी सावंत,मुन्ना पाटील,ठाणसिंग राजपूत,संतोष धनगर, दगा धनगर,सुनील गिरासे,कृष्णा राजपूत,मांडळचे सरपंच योगेश मोरे,जगन पाटील उपस्थित होते.
यावेळी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, विकास कामांमध्ये वाद घालण्यापेक्षा सर्वांनी सोबत यायला हवं. शनिमांडळ परिसरातील गावांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील. शनिमांडळ,रनाळा पाणी पुरवठा योजनेसाठी निविदा निघालेली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल. योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या पाण्याच्या प्रश्न सुटणार आहे. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येईल अशी माहिती माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.








